Imran Khan Arrest : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये आगडोंब
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आगडोंब उसळलाय... इम्रान खान यांचे समर्थक आक्रमक रस्त्यावर उतरलेत. अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड झालीय... इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात अक्षरश: हिंसक धुडगूस घातलाय. अनेक ठिकाणी रस्ते अडवले गेलेत, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या घराला घेराव घालत, दगडफेकही केली गेलीय. त्याचप्रमाणे, लाहोरमध्ये लष्कराच्या कमांडरच्या घरात घुसून तोडफोड केलीय. तर तिकडे मुलतानमध्ये कोअर कमांडरच्या घराला कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत काही ठिकाणी हवेत गोळीबारही केलाय. इम्रान खान यांच्या अटकेविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिलीय. दरम्यान, जवजवळ अर्ध्या पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय. एकूणच, आधीच आर्थिक संकटाच्या खाईत असलेल्या पाकिस्तानात इम्रान खान यांच्या अटकेमुळे गृहयुद्धाचा प्रचंड मोठा भडका उडालाय.
![Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/74b1517b5bb7fd14207c067eca0599751738345265770718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/af97e2f2c19b785fdea18881264207721735955346680718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/21/b546e7bea92658fe529053e2da73c7b51732178769064719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/6d2e61d25636de3fcc7207e1114811df172959916923990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/20/8921f31a1937955b1f0f07be12e950501729363385304718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)