एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक

Chhatrapati Sambhajinagar : आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून करुन चित्रपटासारखा बनाव रचणाऱ्या तिघांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये  सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. ‘खतरों के खिलाड़ी’सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतरही बराच काळ कोणताही शो सुरू न झाल्याने प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी करत होते.

सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.

जेसीबीचालकाला फसवून खड्डे काढले

आरोपींनी लोंढे यांचा मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले. पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह त्यामध्ये पुरण्यात आला. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच मृत राजाराम लोंढे यांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. प्रा. लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही आरोपींनी दिली होती. 

या प्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आढळून आला आणि पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

असा झाला खुनाचा उलगडा

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी केली असता, आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Crime News: आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू;
'50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget