Pakistan Police Viral Video: 50 हजारात मुलगा विकत घ्या! ABP Majha
मुलांना विकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात २ लहान मुलांना घेऊन पाकिस्तानमधला एक पोलीस कर्मचारी भररस्त्यात मुलांची विक्री करण्यासाठी उभा होता. ५० हजार रुपयांमध्ये मुलांची विक्री करण्याच्या घोषणा तो देत होता. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातला हा व्हीडिओ असल्याचं कळतंय. या व्हिडीओतील व्यक्ती निसार लाशरी असून तो कारागृह विभागाचा कर्मचारी आहे. मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्या उपचारासाठी रजा मागितली असता, वरिष्ठांनी लाच मागितल्याचा आरोप या कर्मचार्यानं केलाय. पुढे लाच दिली नाही म्हणून वरिष्ठांनी त्यांची ७५ मैल म्हणजेच सुमारे १२० किमी अंतरावरील लार्कना शहरात बदली केली. त्यामुळे अखेर वरिष्ठांना लाच देण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या मुलांनाच विक्रीला काढलं.























