एक्स्प्लोर
Wardha Accident : बाईकस्वाराला वाचवायला गेलेल्यांनाच मागून येणाऱ्या वाहनाने चिरडलं : ABP Majha
रस्त्यात पडलेल्या एका बाईकस्वाराला वाचवायला गेलेल्यांनाच मागून येणाऱ्या वाहनाने चिरडलं. या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. वडनेर पासून अडीच किमी अंतरावर हा अपघात घडलाय. रस्त्यात कडेला उभ्या असलेल्या टिप्परला एक बाईकस्वार येऊन धडकला. खाली पडलेल्या बाईकस्वाराला उचलण्यासाठी कार थांबवत काहींनी धाव घेतली. तेवढ्यात वडनेरकडून येरणगावकडे येणाऱ्या दुसऱ्या टिप्परने मदतीसाठी आलेल्या पाचजणांना चिरडलं.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















