Pakistan Super Legue : पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत खेळवण्यास यूएईचा नकार
Pakistan Super Legue : पाकिस्तान सुपर लीगचे सामने दुबईत खेळवण्यास यूएईचा नकार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत वेळापत्रकातील बदल आणि उर्वरित सामन्यांचं आयोजन यासंदर्भातील परिस्थितीचं आकलन केल्यानंतर नवी माहिती दिली जाणार आहे. सर्व फ्रँचायजी आणि भागीदारांसोबत चर्चा केल्यानंतर स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयनं भारतीय सैन्यावर विश्वास दाखवत आणि सर्व घटकांच्या हितासाठी निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
बीसीसीआयनं या परिस्थितीमध्ये भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही भारत सरकार आणि भारतीय सैन्याला पूर्णपणे समर्थन देतोय,असं त्यांनी म्हटलं. भारतीय सैन्यानं गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांना नाकाम केलं आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी हल्ला केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं भारताच्या 15 शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केलाहोता.

















