(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Mumbra Shakha : कार्यकर्त्यांच्या गराडा ठाकरेंचा ताफा थांबवला, मुंब्य्रातील राडा
Uddhav Thackeray Mumbra Shakha : कार्यकर्त्यांच्या गराडा ठाकरेंचा ताफा थांबवला, मुंब्य्रातील राडा
ठाणे : खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो असं थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं.
पोलिसांनी आज या चोरांचं रक्षण केलं, पण या चोरांनी मशमाशीच्या पोळाला डिवचलं आहे, यांना फोडल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीवेळी या चोरांचे डिपॉजिट जप्त करा असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
यांना सत्तेचा माज आला असून बुलडोजर लावून त्यांनी शिवसेनेची शाखा पाडली, खरा बुलडोजर काय असतो हे यांना दाखवण्य़ासाठी आलो होतो. पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.