Uddhav Thackeray Mumbra Shakha : मुंब्र्यात राडेबाजीवेळी अजाण सुरू, दोन्ही गटाचे शिवसैनिक शांत
Uddhav Thackeray Mumbra Shakha : मुंब्र्यात राडेबाजीवेळी अजाण सुरू, दोन्ही गटाचे शिवसैनिक शांत
ठाणे: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंब्र्यातील शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे शाखेच्या बॅरिकेट्सपर्यंत पर्यंत गेले आणि पोलिसांच्या आवाहनानंतर ते परत फिरले. त्यानंतर शिंदे गटाने विजयाचा दावा केला तर ही शाखा परत मिळवणारच असा निश्चय ठाकरे गटाने केला.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः बॅरिकेट्सपाशी पोहोचले. पोलिसांनी पुन्हा केलेल्या आवाहनांतर उद्धव ठाकरे पुन्हा गाडीत बसले आणि त्यांचा ताफा वळला.
महत्त्वाच्या बातम्या























