Thane Crime : ठाणे तिहेरी हत्याकांडीतील आरोपी गजाआड , हरियाणातून केली अटक ABP Majha
Thane Crime : ठाणे तिहेरी हत्याकांडीतील आरोपी गजाआड , हरियाणातून केली अटक ABP Majha
ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली परिसरात पत्नी आणि दोन लहान मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत हरियाणातून अटक केलीये. अमित बागडी असं या आरोपीचं नाव आहे. अमितला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी गेल्या चार वर्षांपासून दोन्ही मुलांना घेऊन तिच्या दीराकडे राहत होती. त्याचा अमितच्या मनात प्रचंड राग होता. काही दिवसांपूर्वी अमित हरियाणातून ठाण्यात आला, आणि त्याच्या भावासोबत राहू लागला. भाऊ कामावर गेल्यावर त्यानं पत्नी आणि दोन्ही लहान मुलांची डोक्यात बॅट मारून हत्या केली. त्यानंतर तो हरियाणाला आपल्या मूळगावी पळून गेला. त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रॅक करणं सोपं नव्हतं. मात्र सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीनं ठाणे क्राईम ब्रँचनं त्याला शोधून काढलं, आणि ३६ तासांच्या आत हरियाणातून अटक केली.