(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रोतून सफर; विद्यार्थ्यांशी संवाद
PM Narendra Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रोतून सफर; विद्यार्थ्यांशी संवाद
समाज जीवनात एखादा दिवस संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचा असतो आणि आज बंजारा समाजासाठी तसाच दिवस होता. पोहरादेवीमध्ये अनेक विकासकामांचं स्वप्न बंजारा समाजाचे सर्वात प्रमुख धर्मगुरू रामराव महाराज यांनी पाहिले होते. आज ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi) यांच्या पोहरादेवीच्या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्ण होत असताना, बंजारा समाजाचे विद्यामान धर्मगुरू कबीरदास महाराज (Kabirdas Maharaj) यांच्यावर दुःखाचा एक डोंगर कोसळला होता.
पंतप्रधान मोदी पोहरादेवीला पोहोचण्याच्या वेळी म्हणजेच दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कबीरदास महाराज यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, ही बातमी सामान्य बंजारा बांधवांना कळली तर आजच्या कार्यक्रमाचा उत्साह आणि आनंदाच्या दिवसावर विरजण पडेल, या भावनेने कबीरदास महाराज यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती अनेक तास समाज बांधवांपासून लपवून ठेवली.