Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील सहआरोपी फरार, कोर्टाने सरकारला झापलं
बदलापूरच्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय.. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.. शाळा प्रशासनानं अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाल आणि आपटे यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे... घटनेच्या महिनाभरानंतरही आरोपींचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आलंय..
घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत..
अमित कटार नवरे - वकील,
मोठ्या माशांना या प्रकरणात वाचवलं जातंय
अक्षय शिंदे कुटुंबाला न्याय मिळावाच मात्र, ख-या आरोपींना अटक व्हावी
शाळा व्यवस्थापन आणि अक्षय शिंदे या आरोपींबाबतचा भेदभाव समोर आलाय...
घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनानं पोहोचवला नाही... याशिवाय सिसीटीव्ही फुटेज गायब आहेत...
पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आले नाहीत
पोलिसांना अद्यापही शाळा व्यवस्थापनातील आरोपी सापडत नाहीत...त्यांना अटक केली जात नाहीय...
शाळा व्यवस्थापनातील जे आरोपी फरार झालेत त्यांनी आपल्या वकीलांकरवी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला... मात्र कोर्टानं तो फेटाळलाय
गरज असेल तर आम्ही सुप्रिम कोर्टात दाद मागु
पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकत नाही...
ज्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रार केली होती त्यांच्याकडून दिलासा मिळाला नव्हता...
आता तर, शाळा व्यवस्थापनातील आरोपीही फरार आहेत... त्यामुळे, पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकल्या नाहीत... सामान्यरुपात त्या इतक्यात शाळेत जाऊ शकणार नाहीत...