Thackeray vs Shinde Thane : ठाण्यात 2 गटात राडा, 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्याप्रकरणी शिंदे गटातील योगेश जानकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. काल ठाण्यातील किसननगरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले होते... ठाकरे गटाकडून किसननगरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.. या मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे उपस्थित होते... शिंदे गटाचे योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले.. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं... दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली..दरम्यान किसन नगरमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले.. मात्र तिथं देखील दोन्ही गट आमनेसामने आले... परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं कळल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला...























