Naresh Mhaske on Victory : दिल्लीवारीसाठी चांगली शॉपिंग केली, खासदार होताच म्हस्केंनी काय काय केलं?
Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) दुहेरी लढत पाहायला मिळाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. नरेश म्हस्के या निवडणुकीत विजयी व्हावे याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मुख्यमंत्र्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असलेले नरेश म्हस्के विजयी होणं हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं होतं. तर दुसरीकडे राजन विचारे निवडणुकीत विजयी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले. बालेकिल्ल्यासाठी दोन्ही शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. ठाण्यात नरेश म्हस्के विजयी झाले असून राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. नरेश म्हस्के 6,54,895 मतांनी विजयी झाले आहेत. तर राजन विचारे यांना 4,69,298 मते मिळाली.
ठाणे लोकसभा निकाल (Thane Lok Sabha Election Result 2024)
उमेदवाराचे नाव | पक्ष | विजयी उमेदवार |
नरेश म्हस्के | शिवसेना शिंदे गट | विजयी |
राजन विचारे | शिवसेना ठाकरे गट | पराभव |
ठाण्यात किती टक्के मतदान?
ठाण्यात मतदारांमध्ये निरुत्साह होता. त्यामुळे मतटक्क्यात घट दिसून आली. 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतानाच दमछाक होती. मतदारांकडून नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दलची कमालीची नाराजी दिसली. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झालं. पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के आहे.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Thane Lok Sabha Voting Percentage 2024)
- एकूण मतदान - 52.09 टक्के
- मिरा भाईंदर - 48.95%
- ओवळा माजिवडा - 50.72%
- कोपरी पाचपाखाडी - 56.25%
- ठाणे - 59.52%
- ऐरोली - 48.47%
- बेलापूर - 51.53%
कोणत्या मतदारसंघात कोण आमदार?
- मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)
- ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)
- कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
- ठाणे - संजय केळकर (भाजप)
- ऐरोली - गणेश नाईक (भाजप)
- बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
-