Thane Saket Bridge : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत ब्रिज धोकादायक झाल्याचा मनसेचा दावा...
नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडींचा नेहमीच फटका बसणाऱ्या ठाणे- भिवंडी बायपासवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील साकेत पुलाच्या डागडुजीचं काम तातडीने हाती घेतल्यामुळे वाहतूककोंडी होण्याचीच शक्यता आहे. हा पूल मनसे कार्यकर्त्यांनी धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. त्यानंतर पुलाच्या एक्सपान्शन जॉईंट मधील बेअरिंग तुटल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढलंय. आता या पुलाचं काम सुरू झालं असून काम पूर्ण होण्यास ६ ते ७ दिवस लागतील. त्यासाठी पुलावरील नाशिकच्या दिशेची एक मार्गिका बंद ठेवण्यात आलीय. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही या पुलाची पाहणी केली.























