Chandrakant Patil : Jitendra Awhad नवा इतिहास लिहीतायत, औरंगजेब वक्तव्याप्रकरणी हल्लाबोल
Jitendra Awhad News: राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते हे सांगताना आव्हाडांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं' असं म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji maharaj) केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला. या वादावर बोलताना ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच वाद ओढवून घेतला.






















