एक्स्प्लोर

Gudi Padwa : डोंबिवलीत 150 फुटांची महाकाय गुढी; नववर्ष स्वागतयात्रेत भव्य सांस्कृतिक जल्लोष

Gudi Padwa 2026 : डोंबिवलीत गुढी पाडव्याच्या स्वागतयात्रेत 150 फुटांची भव्य गुढी आकर्षण ठरली. वंदे मातरम् 150 वर्ष आणि RSS शताब्दीवर आधारित चित्ररथांनी वेधलं लक्ष.

ठाणे : गुढीपाडव्याच्या निमित्तानं शहरात काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा नेहरू मैदानात उभारलेली तब्बल 150 फुटांची महाकाय गुढी हे प्रमुख आकर्षण ठरलं. भव्य आणि दिमाखदार स्वरूपात उभारलेली ही गुढी हिंदू संस्कृतीचा आणि नववर्षाच्या मंगल प्रारंभाचा प्रतीक म्हणून डौलात उभी करण्यात आली.

डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेचं यंदाचं 28वं वर्ष असून, शहरातील सांस्कृतिक परंपरा जपण्याचा हा उपक्रम असल्याचं सांगण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सांगितलं की, “तरुण पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी ही संकल्पना सुरू करण्यात आली.”

परंपरेचा अभिमान

ही स्वागतयात्रा श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. या उपक्रमाचं श्रेय आबासाहेब पटवारी आणि सुधीर जोगळेकर यांना जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

150 फुटांची गुढी

यंदाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली दीडशे फुटांची गुढी, जी विशाल हिंदुत्व आणि सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक ठरली. रविंद्र चव्हाण म्हणाले की, “ही गुढी भव्य सांस्कृतिक सोहळ्याचं प्रतीक म्हणून उभारण्यात आली.”

चित्ररथांनी वेधलं लक्ष

त्याच बरोबर डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (150वे) वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (100वे) वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने 2 चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. या चित्ररथांना डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशभक्तीवर आधारित उपक्रम

यंदा “क्रांतिकारी देशसेवक” या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये 5 वर्षांच्या मुलांपासून 75 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. विजेत्यांना 25,000 रुपये, तर उपविजेत्यांना 15,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात आलं.

डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या सर्व उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेसोबत राष्ट्रीय भावनेचंही दर्शन यंदाच्या स्वागतयात्रेत घडलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
जीवघेण्या खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी; दुचाकी घसरल्यानं ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू, ठाणे-भिवंडी मार्गावरील घटना
जीवघेण्या खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी; दुचाकी घसरल्यानं ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू, ठाणे-भिवंडी मार्गावरील घटना
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget