Tuljabhavani Temple : मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर मुस्लिम बांधवांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राचं आराध्यदैवत तुळजाभवानीच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं अवघ्या आठ तासांत मागे घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक आता काढून टाकण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, असा सल्ला या फलकांवर देण्यात आला होता. त्यामुळं भाविकांचा झालेला संताप एबीपी माझानं दाखवला आणि अवघ्या आठ तासात मंदिर प्रशासनानं निर्णय बदललाय. माझाच्या बातमीनंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतेही निर्बंध नसतील, असं लेखी स्पष्टीकरण तहसीलदार सौदागर तांदळेंनी दिलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम बांधवांना प्रवेश नाकारण्यात आला.. आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला.. पण इकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात मुस्लिम बांधव येऊन मोेठ्या श्रद्धेनं देवीचं दर्शन घेतायत...आमच्या प्रतिनिधीला 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शनाला आलेली पाच ते सहा मुस्लिम कुटुंब दिसली. त्यांनी गर्भगृहामध्ये जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतलेलं होतं.. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात
![Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/03/15b8ff8c4692e737a6ef9b2993de3b191733200591829719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/42ba6502b865105cf8ef5963da68f296173191345011090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/19c4f0bb193f64ccf36e8b7260fe40661727673294819719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/29/0e3ffdb726716980e1a5c541d2acdce7172761118906290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/5ea14989eef90e6c981aaaf39119b9eb172745054128190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)