Solapur च्या माचणूर इथल्या प्राचीन गणेश मंदिरात फरशीची तोडफोड, भाविकांचा संताप : ABP Majha
राज्यभर गणरायाचं जल्लोषात स्वागत होत असताना तिकडे सोलापुरात मंगळवेढा तालुक्यातील माचणूर इथल्या प्राचीन गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय... मंदिरातील फरशी कामावर माणचूर गावातील ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाय.. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाद उफाळल्याचं पाहायला मिळालं....
मंदिरातील तोडफोडीनंतर ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.. गावकऱ्यांनी तातडीने पुरातत्व विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे . मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलीय.


















