Kartiki Ekadashi 2022 :उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सपत्निक शासकीय महापूजा
आज कार्तिकी एकादशी.. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.दरम्यान आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं... शासकीय महापुरजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला...