Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात समुद्राला उधाण,किनाऱ्यावर ती तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा ABP MAJHA
Sindhudurg Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे . हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने रविवारी रात्रीपासून चांगलंच झोडपलंय . सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 109 मी .मी . पावसाची नोंद झाली आहे . मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांनी समुद्राला उधाण आलं आहे . समुद्राच्या लाटांनी रौद्ररूप घेतलं असून सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतायत.नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे . (Rain Update)
सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस
गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 109 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली असून येथे तब्बल 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात 132 मिमी, वेंगुर्ले 129 मिमी, वैभववाडी 122 मिमी, कुडाळ 113 मिमी, मालवण 105 मिमी, देवगड 98 मिमी आणि कणकवली तालुक्यात 95 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं आहे. वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेला असून रात्रभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली गेलाय. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या दोन तासांपासून वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गे वाहतूक वळविली आहे.























