एक्स्प्लोर
Suresh Khade On Karnataka Government : जत तालुक्याला न्याय द्यायं काम आम्ही करणार- पालकमंत्री खाडे
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्याकडून नवी कुरापत सुरू आहे... महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलंय. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तेथे पाण्याची तीव्र टंचाई भासते यामुळे तेथील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई म्हणाले. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संवाद साधला
आणखी पाहा























