Sangli Jat Water Scheme : सांगलीच्या जतमधील 65 गावांसाठी आनंदाची बातमी, 'म्हैसाळ' योजनेचं काम सुरु
Sangli Jat Water Scheme : सांगलीच्या जतमधील 65 गावांसाठी आनंदाची बातमी, 'म्हैसाळ' योजनेचं काम सुरु
65 वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे काम अखेर सुरू करण्यात आलेय. ज्या भागातून ही योजना जाणार त्या मार्गावर पाईपचा कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरु करण्यात येतोय. पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्याने या भागातील सिंचन योजनेचे काम सुरु करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते.((या योजनेचे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे. या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 57 किलोमीटर अंतरापर्यत पाणी पोचविले जाणार आहे. म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर असलेल्या जत तालुक्यातील मौजे येळदरी पर्यत जवळपास 740 मीटर उंचीवर पाणी पोचविले जाणार आहे.या योजनेचे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.