(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Vaze | अंबानी स्फोटक प्रकरणात वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयएची कोठडी
मुंबई : काल रात्री (13 मार्च) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अशातच सचिन वाझेना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 14 दिवसांच्या कोठडीची एनआयएने कोठडी मागितली होती. मात्र एनआयए कोर्टानं केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री (13 मार्च) रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. अशातच आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असून एनआयएकडून त्यांना 25 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.