Uddhav Thackeray Khed Sabha : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरीत सभा होणार आहे... ही सभा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे... खेडच्या गोळीबार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे... निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय.. नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होतेय..त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.. विशेष म्हणजे कोकणातील मुस्लिमांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन मुस्लीम सेवा संघानं केलंय... उद्धव ठाकरे हे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवणारे नेते असल्याचा उल्लेख या पत्रात केलाय.























