Ratnagiri Oil on Sea:रत्नागिरीत-वेत्ये समुद्रकिनारी तेलसद्दश पदार्थ, बुडालेला जहाजातून तेलगळती सुरु
Ratnagiri Oil on Sea : चारच दिवसांपूर्वी विजयदुर्ग समुद्र किनारापासून 40 वाव आतमध्ये तेलवाहू जहाज बुडाले होते. असे असताना आता राजापूर तालुक्यातील आंबोळगड आणि वेत्ये समुद्र किनारपट्टीच्या भागात तेल सदृश्य पदार्थ आढळून येत आहेत. किनारपट्टीपासून दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये तेल सदृश्य पदार्थ आढळल्यामुळे मच्छीमारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय त्यावरील 19 खलाशाना वाचवले पण त्यावरील तेलाचे किंवा मालाचे नेमकं काय झालं? याचं मात्र कोणतंही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे याच जहाजातील तेल सदृश्य पदार्थ किनारपट्टी भागात येत असावेत असा अंदाज स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत. शिवाय समुद्री प्रदूषणाबद्दल चिंता देखील व्यक्त करत आहेत.























