Nana Refinery : राजापूर रिफायनरी महाराष्ट्रातून जाणार? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींचं सूचक वक्तव्य
'रिफायनरीचा प्रकल्प पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या राज्यात होऊ शकतो असं सूचक वक्तव्य पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी केलंय. कोकणात राजापूरमधील रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु असताना पेट्रोलियम मंत्र्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं. या प्रकल्पाबाबत राज्यांकडून किंवा गुंतवणूकदारांकडून कुठलाही स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही, असंही पुरी यांनी म्हटलंय. याबाबत सर्वांकडून प्रस्ताव मागवला असल्याचं त्यांनी सांगितलं. 60 मिलियन मेट्रिक टनाचा हा प्रकल्पा महाराष्ट्रात कुठेही किंवा पश्चिम किनारपट्टीवर अथवा दक्षिणेकडील राज्यांतही होऊ शकतो, असं पुरी म्हणाले. आम्ही या प्रकल्पाचे दोन किंवा जास्त भाग करून वेगवेगळ्या ठिकाणीही उभारू शकतो. पण 3 लाख कोटींचा प्रकल्प एकाच ठिकाणी झाला तर खूपच चांगलं आहे, असं पुरी यांनी म्हटलंय.


















