पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथील एका प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray on Ravindra Chavan : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांनी लातूर येथील एका प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुक राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आपण पदाने मोठे झालोत, याचही भान सुटलं आहे. पदं काढून घ्या बाजूच्या गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, अशी टीका राज ठाकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केली होती.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
रवींद्र चव्हाण लातूरमध्ये म्हणाले की, विलासरावांच्या सगळ्या आठवणी पुसून टाकू यावर राज ठाकरे म्हणाले की, कोण आहात तुम्ही? साधी गोष्ट आहे आपण पदाने मोठे झालेले आहोत, याचंही भान सुटलंय यांचं. यांची पदं काढा हो उद्या, बाजूच्या गल्लीत गणपतीला नाही बोलवणार यांना अशी टीका राज ठाकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केली. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. या टीकेचा व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर चांगलचा व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या एका वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर एक वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
टीकेनंतर चव्हाणांनी व्यक्त केली दिलगिरी
रविंद्र विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. जनक्षोभ वाढत असल्याचे पाहून, अखेर रविंद्र चव्हाणांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा उद्देश नवीन विकासात्मक रेकॉर्ड तयार करण्याबद्दल बोलण्याचा होता आणि विलासराव देशमुख यांच्या कार्याबद्दल सर्वांना आदर असल्याचे चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























