Barsu refinery project: ठाकरे गटाची भुमिका काय ?
उद्धव ठाकरे आज रिफायनरीबद्दल भूमिका मांडणार आहेत. असं असलं तरी कोकणातले नेते मात्र रिफायनरीच्या मुद्द्यावर मूग गिळून बसले आहेत. ज्या ठाकरे गटाला कोकणानं भरभरून दिलं, त्या ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यातले सर्व आमदार मौन बाळगून आहे. बारसूचा प्रकल्प ज्यांच्या मतदारसंघात येतो ते राजन साळवी तर गेल्या अनेक दिवसांपासून दिसलेलेच नाहीत. वास्तविक, नाणारचा प्रकल्प तत्कालीन शिवसेनेनं हाणून पाडला होता.. तेव्हा राजन साळवी, विनायक राऊत हे लोकप्रतिनिधी विरोध करण्यात आघाडीवर होते.. बारसू-सोलगाव रिफायनरीच्या ताज्या आंदोलनाच्या ठिकाणी मात्र त्यांच्यातील एकही नेता फिरकलेला सुद्धा नाही. तीच परिस्थिती भाजपच्या लोकप्रतिनिधींची आहे.. संपूर्ण कोकणाचे नेते म्हणून मिरवणारे राणे भावंडही गप्प आहेत. भाजपची भूमिका रिफायनरीच्या बाजूनं आहे, मात्र ती भूमिका देखील नितेश आणि निलेश राणे यांनी मांडलेली नाही. त्यामुळे, रिफायनरीच्या लढ्यात केवळ सामान्य जनता आणि रिफायनरी विरोधी संघटनाच उरली आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.