Barsu Ratnagiri Refinery : राजापुरातील बारसूमध्ये मातीचं प्रदुषण रोखण्यासाठी माती परिक्षण?
राजापूरमधल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधातल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. त्या परिसरातल्या माती परिक्षणासाठी ड्रिलिंग करण्याच्या कामाला वेग आला आहे.त्यामुळं रिफायनरी विरोधात स्थानिक आंदोलक आणखी आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांंच्या निर्धाराला बळ पुरवलं. बारसू रिफायनरीला सुरू असलेला विरोध राज्य सरकारला बळाचा वापर करून मोडीत काढायचा आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वेळ पडली तर मुंबईतली अख्खी शिवसेना बारसूमध्ये उतरवू, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिल्याचं विनायक राऊतांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं.























