Pune Bar New Rules : बार चालकांवर कारवाईचा फास, महत्वाचे 7 नियम कोणते? Accident Case
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर (Pune Porsche Car Accident) नियमांचं उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अॅक्टिव्ह मोड मध्ये आली आहे. शहरातील रस्ते अन् गल्ली-बोळातून ते दुचाकीवर रात्र गस्त घालतायेत. या दरम्यान येणारे पब, हुक्का पार्लर आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का? अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायेत का? यावर आता पोलीस करडी नजर ठेवत आहेत .