एक्स्प्लोर

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान

पुणे : मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर पुण्यातही (Pune) होर्डींग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे. त्यातच, आज आणखी एक होर्डींग कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे. राज्यातील काही भागात आज पुन्हा मुसळधार (Rain) पाऊस पडला असून विदर्भातील अकोला, कोकणातील सिंधुदुर्गातही पावसाने हजेरी लावली होती. सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे.  

पुणे सोलापूर रोडवरील गुलमोहर लॉन्स येथे ही घटना घडली असून टोलनाक्या शेजारी उभारलेलं मोठं होर्डिंग मुसळधार पावसामुळे कोसळलं आहे. या होर्डिंगशेजारी बँड पथक उभे होते, अचानक वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात हे होर्डींग बँड पथकावर पडल्यामुळे बँड पथकाचे नुकसान झाले आहे. तर, बँड पथकातील होर्डींगखाली अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बँड पथकातील लोकांनी तत्काळ घोड्याला बॅनरखालून बाहेर काढले आहे, सध्या घोड्यावर उपचार करण्यात येत आहे. 

पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका इथे लग्नाची मिरवणूक सुरु होण्याआधी मंगल कार्यालयाजवळील होर्डींग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली कोसळले. त्यामधे नवरदेवासाठी आणलेला घोडा गंभीर जखमी झाला असून बॅड पथकाच्या गाडीसह इतर वाहनांचेही नुकसान झालं आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर  गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळून हा प्रकार घडला. त्यामधे दुचाकी, चार चाकीसह बँड वादकांच्या गाडीचेही नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.  

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli RCB Champion IPL 2026 : आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंतर चेज मास्टर कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?
आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंतर चेज मास्टर कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?
Horoscope Today 1 June 2026: जूनचा पहिलाच दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने भाग्योदयाला सुरूवात, आजचे राशीभविष्य
जूनचा पहिलाच दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने भाग्योदयाला सुरूवात, आजचे राशीभविष्य
RCB vs GT Final Live Update : बंगळुरुने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांचा जिंकली IPL ची ट्रॉफी
RCB vs GT Final Live Update : बंगळुरुने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांचा जिंकली IPL ची ट्रॉफी
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget