Pune gangster Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या, कोण होता शरद मोहोळ? ABP Majha
Sharad Mohol : कोण होता शरद मोहोळ? कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या तीन पैकी एका आरोपीचं नावं समोर .. कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या
Pune Latest Marathi News Update : पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad mohol) याच्यावर पुण्यातील कोथरुड (pune kothrud) परिसरात गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुंड शरद मोहोळ याच्यावर झालेला हा जीवघेणा कुणा केला ? हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे.
Maharashtra Pune Kothrud Crime News : भरदुपारी गोळीबार
शुक्रवारी भरदुपारी कोथरुडमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)