एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pimpari Mahavitaran : पिंपरी चिंचवडलाही वीज कर्मचारी आंदोलनाचा फटका, दीड हजार लघू उद्योग बंद

Mahavitaran Strike : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees)  संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल तसेच दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. महावितरणाच्या राज्यव्यापी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा संपात समावेश आहे. तर रायगडमध्ये 1 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे व्हिडीओ

Pune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर
Pune Helmet Compulssion: पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोपABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित
2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, बाबा वेंगांचं भाकित
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
Embed widget