(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune MPSC Protest : पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन, काय आहे कराण? जाणून घ्या
Pune MPSC Protest : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी (MPSC) नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी (PUNE) रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर शेकडो विद्यार्थी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात मोठ्या प्रमाणात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात मात्र 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे. अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थांना मान्य नाही. त्यामुळे नवा अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा, अशी मागणी विद्यार्थांनी राज्य सरकारकडे केली आहे.