PM Modi Pune Metro And Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
आजच्या दिवसभरात सर्वात चर्चेचा विषय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन झालं, तेव्हा त्यांच्या स्वागताला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडूशठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत, विधिवत अभिषेकही केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ यांच्या कार्याचा उल्लेख केला. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला. त्यानंतर, नरेंद्र मोदींचा ताफा एसपी कॉलेजकडे रवाना झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यावेळी, लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याच्या माथ्यावरचा अभिमानास्पद टिळा असल्याचं वक्तव्य केलं. त्याचसोबत, हा पुरस्कार मिळाल्याने आपल्यावरची जबाबदारी वाढल्याचं मोदींनी म्हटलंय. दरम्यान, लोकमान्य टिळक पुरस्कार आपण १४० कोटी भारतीयांना अर्पण करत आहोत, असं मोदींनी जाहीर केलंय. त्यानंतर मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी, महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल आणि महाराष्ट्राने आजवर देशाच्या विकासाला मोठा हातभार लावल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढलेत.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)