(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrakant Patil :देवेंद्र फडणवीसांच्या काळात सगळं सुरळीत होतं,आता गुन्हेगारी वाढली:चंद्रकांत पाटील
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी एकाची हत्या झालीये. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये एकावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्यात. ह्या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही देखील कॅमरामध्ये कैद झालीये. नागेश कराळे नामक व्यक्तीचा यात जागीच मृत्यू झालाय. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी नागेश कराळेवर हा गोळीबार केला. नागेश कराळे स्वतःच्या वाहनात बसताच हे मारेकरी तिथं पोहचले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. गेल्या सहा दिवसांत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही तिसरी हत्या आहे. शनिवारी पिंपळेगुरव मध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला. बुधवारी तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हथोड्याने प्रहार करून हत्या करण्यात आली आणि गुरुवारी पुन्हा हा गोळीबार झाला. त्यामुळे आयर्नमॅन म्हणून ओळख असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं राज्यात कायदा सुव्यवस्था राम भरोसे असल्याचं चित्र आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी एकाची हत्या झालीये. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये एकावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्यात. ह्या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही देखील कॅमरामध्ये कैद झालीये. नागेश कराळे नामक व्यक्तीचा यात जागीच मृत्यू झालाय. काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी नागेश कराळेवर हा गोळीबार केला. नागेश कराळे स्वतःच्या वाहनात बसताच हे मारेकरी तिथं पोहचले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. गेल्या सहा दिवसांत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही तिसरी हत्या आहे. शनिवारी पिंपळेगुरव मध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला. बुधवारी तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हथोड्याने प्रहार करून हत्या करण्यात आली आणि गुरुवारी पुन्हा हा गोळीबार झाला. त्यामुळे आयर्नमॅन म्हणून ओळख असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं राज्यात कायदा सुव्यवस्था राम भरोसे असल्याचं चित्र आहे. वाढत्या गुन्हेगारीचे विधानभवनात पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे. फडणवीसांच्या काळात सगळं सुरळीत होतं, मात्र आता गुन्ह्येगारी वाढली आहे असं मत चंद्रकांत पाटील यांनी मांडलं आहे.