(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aniket Vishwasrao : अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा, मानसिक छळ केल्याचा पत्नीचा आरोप
सिनेक्षेत्रात आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे नाव मोठं होऊ नये म्हणून पत्नीला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तक्रार अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा विश्वासराव हिने पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यांमध्ये नोंद केली इतकच नाही तर अनिकेत विश्वासराव याचे अनैतिक संबंध असून आपल्याला बदनाम करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अनेकदा अपमानजनक वागणूक त्याच्याकडून दिली जात असल्याची ही तक्रार स्नेहा विश्वासराव हिने केली आहे... आपला शारीरिक तसेच मानसिक छळ ही मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची नोंद तिने या तक्रारींमध्ये केली आहे. स्नेहा आणि अनिकेत या दोघांचाही विवाह नंबर 2018 मध्ये झाला होता. अनिकेत विश्वासराव यांनी लपून-छपून या सिनेमातून तर स्नेहा तिची आई राधिका चव्हाण याही मराठी सीरिअल्समध्ये अभिनय करतात त्यातूनच अनिकेत आणि स्नेहा यांची ओळख झाली होती ऊन-पाऊस कळत नकळत फक्त लढ म्हणा यासारख्या कलाकृतींमधून अनिकेत विश्वासराव प्रचंड लोकप्रिय झाला होता...