एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Uddhav Thackeray on EC : निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, उद्धव ठाकरेंची कडाडून टीका
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनाच्या मुलाखतीत त्यांनी आयोगावर टीका केली. "निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या" असे ते म्हणाले. शिवसेना नाव आणि चिन्ह इतरांना देण्याचा या धोंड्याला अधिकार नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. देश अंशात अस्थिर ठेवायचा हेच भाजपचे धोरण आहे, असेही त्यांनी नमूद केले. मोदींची पंचाहत्तर वर्ष भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिला आहे, असेही ते म्हणाले. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता ABP Majha वर प्रसारित होणार आहे. पक्षातल्या Outgoing चे उद्धव ठाकरेंनी समर्थन केले. "आमच्या पक्षातून दिवटे गेलेत बरं" असे म्हणत त्यांनी पक्षातल्या Outgoing वरच टीका केली. काही वेळेला चाचलेल्या डबक्याला Outlet द्यावा लागतो, असे त्यांचे मत होते. भावनेच्या किंवा प्रेमापोटी अनेकदा अयोग्य माणूस जवळ ठेवला जातो, मात्र तोच अयोग्य माणूस स्वतःहून गेला की 'चला बला गेली' असे वाटते, असेही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















