Uddhav Thackeray full speech : Raj Thackeray यांच्यासोबत युतीवर जवळपास निश्चित, राणेंवर टीकास्त्र
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसे सोबतच्या युतीसंदर्भात सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीचा पर्याय अजून खुला असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. शिवसेनाप्रमुखांच्या ब्रँडचा उल्लेख करुन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढं टाकलं आहे. जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी युतीबाबत काय म्हणाले?
ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाही, शिवसेनेची नाही. 1960 साली ज्या मराठी माणसानं बलिदान देऊन, रक्त सांडून मुंबई मिळवून दिली, त्या मुंबईचं महत्त्व खत्म होऊ देणार नाही म्हणून उभं राहिलो तर मुंबई वाचेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं, नाही होणारं का? होणार की नाही होणार कळेल ना,जे यांच्या मनात आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याच्या जनतेच्या मनात जे आहे ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटत आहेत.मालकांचे नोकर तुम्ही जर का मुंबईवर तुम्हाला ताबा मिळाला नाही, पुन्हा मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार त्याच्यामुळं शेठजींचे नोकर, आणि शेठजींच्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणे वर्धापन दिन साजरा करत आहेत. अरे तुला काय करायचं तुला नाही होत, आमचं काय करायचं ते आम्ही बघू, असं आव्हान उद्दव ठाकरे यांनी दिले.






















