Uddhav Thackeray Full PC : दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता
Uddhav Thackeray Full PC : दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले ..
मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननामा चा अनावरण केलं हा मतदार संघ आधीपासून आमचा आहे सुशिक्षित मतदारांचे प्रश्न वेगळे असतात प्रमोद नवलकर यांनी आधी या मतदार संघांचे नेतृत्व केले आहे आपल्या काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू हे मतदान २६ जून ला आहे सुट्टी नाहीये, कार्यलय जाण्यापूर्वी मतदान करावं कुठेही बिघाड झाला नाही संवाद मध्ये लूज कनेक्शन होतं काँग्रेस पक्षश्रेष्टी शी माझं आणि संजय राऊत बोलणं झालं आणि आम्ही बोलणं करून आम्ही अर्ज मागे घेत आहोत मला याबद्दल काही आता बोलायचं नाही मोहन भागवत म्हणताय मणिपूर झळतंय १ वर्ष नंतर तरी ते बोलताय काश्मीर मध्ये काय फरक पडलाय? जीव तर तिथे अजून जाताय तीन दिवसात तीन हल्ले झाले जबाबदार कोण? मोदी तिथे जाणार नाही मोहन भागवत जे बोलले ते मोदी मनावर घेणार का? मणिपूरच्या झळा त्यांच्या कार्यालया पर्यंत आता पोहोचल्या असतील नड्डा बोले होते आम्हाला संघाची गरज नाही त्यांची गरज संपली आहे बोलतात आता तरी मणिपूर मध्ये पंतप्रधान जाणार आहेत की नाही 370 काढलेल नाही पण होल्ड वर ठेवलं आहे .. उद्धव ठाकरे मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन होत असताना बोलत होते ...