Sujat Ambedkar Political Journey : Raj Thackeray यांना ललकारणारे सुजात आंबेडकर यांची कारकीर्द काय?
महाराष्ट्रची राजकीय परिस्थिती पहिली तर दोन मुख्य घटना सुरू आहेत. एकिकडे भाजप आणि शिवसेनेत ED, CBI, IT आशा केंद्रीय यंत्रणांवरून युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्व हाती घेत मशिदींवरील भोंग्यांना टार्गेट करत रान पेटवून दिलंय.
ये युद्ध सुरू असतानाच एक व्यक्ती समोर येते आणि थेट राज ठाकरेंना लालकरते. इतकंच नाही तर राज आणि अमितसह आदित्य ठाकरेंवर ती व्यक्ती हल्ला बोल करते आणि संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेते. ती व्यक्ती म्हणजे सुजात प्रकाश आंबेडकर.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे हटले नाही तर त्यासमोर आम्ही लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असं म्हणाले. राज ठाकरेंना उत्तर देताना सुजात म्हणाले,"माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. जर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलीस यंत्रणांना माहित आहे कुणाला पकडायचंय". आता सुजात यांच्या या टोल्याला मनसेकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागेल.
कोण आहेत सुजात आंबेडकर?
सुजात आंबेडकर यांची पाहिली ओळख म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते पणतू, यशवंत आंबेडकरांचे ते नातू आणि प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र.