Sanjay Raut PC | देवेंद्र फडणवीस खलनायक म्हणूनच काम करतात, संजय राऊतांची टीका
Maharashtra Politicle Updates : मुंबई : लोकसभा झाली, विधानपरिषद झाली आता विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Nivadnuk) जागावाटपावरुन महायुतीत (Mahayuti) जोरदार हालचाली सुरू आहेत. तसं तर, महायुतीतील सर्व पक्षांनी आपापली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपची (BJP) 288 जागांची तयारी सुरू आहे. पण मिळतील तेवढ्या जागा लढवू, असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 93 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. तर जागावाटपावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
जागावाटपावरुन महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत : संजय शिरसाट
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बोलताना सांगितलं की, "जागावाटपासंदर्भात महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. आता फक्त आम्ही 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेले आहेत, मात्र 288 मतदारसंघातसुद्धा निरीक्षक नेमणार आहोत. भाजपही 288 निरीक्षक नेमणार आहे, तर राष्ट्रवादीसुद्धा 288 जागांवर निरिक्षक नेमणार आहे."
हे ही वाचा :
महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? 288 ची तजवीज, पण निवडणूक महायुतीतच; नेमकं चाललंय काय?