एक्स्प्लोर

महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? 288 ची तजवीज, पण निवडणूक महायुतीतच; नेमकं चाललंय काय?

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं ठरलं? महायुतीतील मित्रपक्षांच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politicle Updates : मुंबई : लोकसभा झाली, विधानपरिषद झाली आता विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Nivadnuk) जागावाटपावरुन महायुतीत (Mahayuti) जोरदार हालचाली सुरू आहेत. तसं तर, महायुतीतील सर्व पक्षांनी आपापली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपची (BJP) 288 जागांची तयारी सुरू आहे. पण मिळतील तेवढ्या जागा लढवू, असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 93 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले आहेत. पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. तर जागावाटपावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

जागावाटपावरुन महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत : संजय शिरसाट

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बोलताना सांगितलं की, "जागावाटपासंदर्भात महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. आता फक्त आम्ही 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेले आहेत, मात्र 288 मतदारसंघातसुद्धा निरीक्षक नेमणार आहोत. भाजपही 288 निरीक्षक नेमणार आहे, तर राष्ट्रवादीसुद्धा 288 जागांवर निरिक्षक नेमणार आहे."

288 जागांची तयारी, पण... : चंद्रकांत पाटील

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितलं की, "भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी आहे, पण महायुतीत लढण्याचा निर्णय ठाम आहे. महायुतीत जेवढ्या जागा मिळतील, त्या लढवू, पण तयारी 288 जागांची आहे. उरलेल्या जागांची तयारी मित्र पक्षांसाठी वापरू." तसेच, जागावाटपाबाबत मतभेद नाही, स्वबळाचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. 

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीतील जागावाटपावरुन बोलताना जोरदार टोला हाणला आहे. प्रत्येक पक्ष भुमिका ठरवतो आणि नेते ठरवतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो? हे पाहावं लागेल, बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात? ते पाहावं लागेल, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Vidhan Sabha Seat Sharing | विधानसभेत महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? ABP Majha                                                       

                                          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget