Sanjay Raut PC | उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, शंकाराचार्यांची भावना; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut PC | उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, शंकाराचार्यांची भावना; राऊतांचा घणाघात
हे देखील वाचा
Sunetra Pawar Sharad Pawar : सुनेत्रा पवार मोदीबागेत, पुण्यात भेटीगाठी, नणंदेच्या भेटीला गेल्याची दादा गटाची माहिती!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली?
सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.