Latur Robbery CCTV : लातूरच्या औसा शहरात मोबाईलच्या दुकानात डल्ला,लाखोंचा माल चोरीला
Latur Robbery CCTV : लातूरच्या औसा शहरात मोबाईलच्या दुकानात डल्ला,लाखोंचा माल चोरीला
हे ही वाचा..
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात अवधूत ज्वेलर्समध्ये दोन अज्ञात महिलांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. 32,000 रुपयांचे सोन्याचे इरिंग (कानातील रिंग) लंपास केले आहेत. भर दुपारी ही चोरीची घटना घडली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका सराफा दुकानात दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत 32,000 रुपयांची सोन्याचे कानातील रिंग चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शिरूर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. फिर्यादी अमोल कचरु दहिवाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दहीवाळ हे त्यांच्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार करत होते. दुपारी साधारण 4.30 ते 4.45 च्या दरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या. सोन्याची कानातील रिंग पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी दहिवाळ व त्यांच्या भावाकडून वेगवेगळी दागिने दाखवण्याची मागणी केली. दुकानातील गर्दीचा आणि त्यांच्या गाफीलपणाचा फायदा घेत या महिलांनी 4 ग्रॅम 200 मिली वजनाची, सुमारे 32,000 रुपये किमतीची कलकत्ता ए प्रकाराची सोन्याची कानातील रिंग लबाडीने चोरुन नेली.























