एक्स्प्लोर

शेतकऱ्याकडून 30 हजारांची लाच घेताना महसूलचे 3 कर्मचारी जाळ्यात; एसीबीची बेधडक कारवाई

सातबारा उतारा करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले या शिपायाने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

रत्नागिरी : मंडणगाव तालुक्यातील शेनाळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने धाड टाकून मंडल अधिकारी, ग्रामसेवकासह एका महसूल कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.  या महसूल कर्मचार्‍यांना शेतकऱ्याकडून तब्बल 30 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल्याने तालुका महसूल प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे. 27 मे रोजी सांयकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी (अतिरिक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना अटक करण्यात आली आहे. 

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून संबंधित सातबारा उतारा करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले या शिपायाने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे भोसले यांनी तक्रारदाराकडून 45 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले आहेत. मात्र, तरीही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केली. त्यानंतर, तक्रारदाराने 27 मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्यासमक्ष भेट घेतली. तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे पुन्हा 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी, ही रक्कम देताना एसीबीने कारवाई करत रंगेहात अटक केली. 

मंडळ अधिकारी शिगवण याने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15,500 स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला. त्यामुळे, महसूल विभागाने कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे. 

उपजिल्हाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

दरम्यान, महसूल विभागात सर्वसामान्यांना सातत्याने पैशाची मागणी केली जाते, कुठलेही काम करण्यासाठी पैसाच द्यावा लागतो अशी ओरड कायम असते. विशेष म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका निवासी उपजिल्हाधिकाऱ्यास एसीबीने रंगेहात अटक केली. या महाशयांनी तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी, 23 लाख रुपये त्यांना पोहोचलेही होते. अखेर, 5 लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा

सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा; राहुल गांधींवरील टीकेवरुन काँग्रेसचा संताप, यशोमती ठाकूर यांचं चॅलेंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget