Nandurbar Shahada | झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले,घरांची पडझड; शहादा तालुक्याला वादळाचा तडाखा
Nandurbar Shahada | झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले,घरांची पडझड; शहादा तालुक्याला वादळाचा तडाखा
राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: फळबागांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यात कुठं कुठं शेती पिकांचं नुकसान झालं आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं फळबागांना फटका
नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ बागांना फटका बसला आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबुज पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर टरबूज जमीनदोस्त झालं आहे. पिकासाठी झालेला दीड ते 2 लाखांचा खर्च गेला वाया गेला आहे. नुकसान झाल्याने 5 लाखांचे कर्ज फेडू कसा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.























