एक्स्प्लोर

Panchkula Crime news: त्या सगळ्यांनी विष प्यायल्याने एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या, घाणेरडा वास, कारचा दरवाजा उघडताच काय दिसलं?

Panchkula family ends life: विष पिऊन कुटुंबीय मेल्यानंतर प्रवीण मित्तल हे कारच्या बाहेर फुटपाथवर बसून होते. त्यांनी एका व्यक्तीला सांगितले की, 'मीदेखील पुढच्या 5 मिनिटांत मरणार आहे'.

Panchkula Crime news: हरियाणाच्या पंचकुला येथे एकात कुटुंबातील सात सदस्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. प्रवीण मित्तल (Pravin Mittal) हे भंगार व्यावसायिक होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले होते. कर्जाचा हा आकडा 20 कोटी रुपयांच्या घरात होता. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने त्यांचा कारखाना, घर आणि अन्य मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यामुळे प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. गरिबीमुळे प्रवीण मित्तल यांच्यावर कॅब चालवायची वेळ ओढावली होती. या सगळ्यामुळे प्रवीण मित्तल यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. (Mass Suicide case in Haryana)

प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना पंचकुला येथील सेक्टर 27 मध्ये कार थांबवून कुटुंबातील सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली. त्यांच्या कारमध्ये दोन पानांची एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये आपले कुटुंब कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

प्रवीण मित्तल यांची पत्नी, त्यांचे आई-वडील आणि तीन लहान मुलांनी विष पिऊन आत्महत्या केली. विष प्यायल्यानंतर सगळ्यांचा जीव गेला. मात्र, प्रवीण मित्तल हे रुग्णालयात नेईपर्यंत जिवंत होते. ते गाडीच्या बाहेर येऊन बसले होते. सेक्टर 27 मधील नागरिकांनी या कारमधून टॉवेल बाहेर लटकत होता. ही गोष्ट तिथून जाणाऱ्या पुनीत राणा नावाच्या व्यक्तीला खटकली. पुनीत राणा आणि त्यांचा भाऊ दोघे कारपर्यंत चालत गेले आणि त्यांनी अंत्यवस्थ अवस्थेत फुटपाथवर बसलेल्या प्रवीण मित्तल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण कुटुंबासह बागेश्वर धामहून परत आलो आहोत, आम्हाला हॉटेल न मिळाल्यामुळे कार रस्त्यात थांबवून झोपण्याचे ठरवले, असे त्यांनी राणा यांना सांगितले. तेव्हा राणा यांनी त्यांना कार मार्केट परिसरात नेण्यास सांगितली. तेव्हा प्रवीण मित्तल जागेवरुन उठले. मात्र, विष प्यायल्याने त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या हालचाली पाहून राणा यांना संशय आला आणि त्यांनी कारचा दरवाजा उघडताच आतमध्ये असलेले मृतदेह त्यांच्या नजरेस पडले.

Panchkula  Mass Suicide: कारचा दरवाजा उघडताच 'ते' भयानक दृश्य दिसलं

प्रवीण मित्तल यांनी कार दुसरीकडे नेण्यासाठी दरवाजा उघडला तेव्हा पुनीत राणा यांनी आतमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी पुनीत राणा यांच्या नजरेस भयावह दृश्य दिसले. कारमध्ये सहा मृतदेह होते. कारचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी आली. कारमधील सहाजण खाली पडले होते. त्यांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या. त्यामुळे कारमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली होती.  हे पाहून राणांनी प्रवीण मित्तल यांना कारच्या बाहेर खेचून या प्रकाराबद्दल विचारले. तेव्हा प्रवीण मित्तल यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे.  मी देखील आता पाच मिनिटांत मरणार आहे. आमच्यावर खूप मोठं कर्ज आहे. आमचे नातेवाईक श्रीमंत आहेत, पण त्यांनी आम्हाला मदत केली नाही, असे प्रवीण मित्तल यांनी म्हटले.

आणखी वाचा

Panchkula Suicide Case: कर्जबाजारीपणाला कंटाळून सात जणांच्या कुटुंबाची आत्महत्या, सत्संगवरुन परतताना विष प्यायलं अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget