![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Monsoon Session 2023 : विरोधकांना विषयच माहिती नाही,पत्राऐवजी ग्रंथच लिहिला : देवेंद्र फडणवीस
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे अधिवेशन होतंय याला खूप महत्त्व आहे. कारण विरोधी पक्षनेताच सहभागी झाल्याने विरोधकांची धार कमी झालीय. दरम्यान, काल विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगेल याचे स्पष्ट संकेत दिलेत. चहापानावरील बहिष्कारावरुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीए... विरोधकांनी बहिष्कार घालताना पत्र लिहिलं की ग्रंथ असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारला तर विरोधकांच्या पत्रात ठोस मुद्देच नसल्याचं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं.... विरोधकांचा आत्मविश्वास गेलेला असून ते गोंधळल्याची टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली... त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या टीकेला विरोधक कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल.
![Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/bd56548c9902fcf9a026409ba04493d11720377891745976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/3f4ac0401f863a73c446a347253d6b9d1720377602990976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/24a2fa131d3efd2271ecfa27cc28be0d1720375883007976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8869cd78bac6e013cae8c93efec95c5d1720374577329976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a108bd5cd7b50ef83227db31dd6c3f081720373930310976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)