HM Anil Deshmukh to be removed? अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद धोक्यात - सूत्र
मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादंग उठले आहेत. अशातच सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीत भूकंपाची शक्यता आहे. राज्याच्या गृहखात्याची धुरा अनिल देशमुख यांच्याकडून काढून घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वाझे प्रकरणात गृहखात्याची आणि सरकारची अडचण होत असल्यानं शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे आता कारवाईची कुऱ्हाड गृहमंत्र्यांवर चालणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


















