नीतीमत्तेची चाड असेल तर उद्धव ठाकरे अनिल देशमुखांचा राजीनामा घेतील - चंद्रकांत पाटील
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहे. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे आता परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे वेशीवर मांडली जात आहेत. अॅन्टिलिया स्पोटक तपासावरुन सुरु झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरण, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहचलं आहे.























